१५ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीची कामे

  • गावांतर्गत रस्ते: गावातील रस्ते, पायवाटेचे बांधकाम, दुरुस्ती आणि देखभाल.
  • पथदिवे: एलईडी पथदिवे किंवा सौर दिवे बसवणे व त्यांची देखभाल.
  • सार्वजनिक जागा: स्मशानभूमी/दफनभूमीचे बांधकाम, देखभाल, आणि जागा संपादन करणे.
  • डिजिटल सुविधा: ग्रामपंचायतीमध्ये हाय बँडविड्थ वाय-फाय (Wi-Fi) नेटवर्क सेवा प्रदान करणे.
  • सेवा: ग्रामपंचायतींना आरोग्य, शिक्षण आणि ग्रामसुरक्षा यांसारख्या सेवा अधिक प्रभावीपणे पुरवण्यास मदत होते.
  • पायाभूत सुविधा: गावातील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत रस्ते आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी व दुरुस्ती करणे
  • स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन :- यामध्ये गावातील स्वच्छता राखणे, हागणदारीमुक्त (ODF) दर्जा कायम ठेवणे, घनकचरा (solid Waste) आणि सांडपाणी व्यवस्थापन (liquid Waste Management) करणे या कामांचा समावेश आहे.
  • अबंधपत्रित निधी (Untied Grants) - ४०%: हा निधी ग्रामपंचायतीच्या स्तरावर ११ व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या २९ विषयांपैकी स्थानिक गरजेनुसार आणि ग्रामसभेच्या मान्यतेने इतर विकासात्मक कामांसाठी वापरता येतो.

ग्रुप मोऱ्हांडा – गोंदे बु अंतर्गत आजपर्यंत विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत.काही विकास कामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत.कि ज्यामुळे गावाची एकी लक्षात येते.